महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे सचिव शेषराव जगताप यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे सचिव शेषराव जगताप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.

पुणे : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे सचिव शेषराव जगताप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जगताप यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

ते महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेत ते ३५ वर्षे कार्यरत होते. 
वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर जगताप यांनी सभेत लेखनिक म्हणून कामास सुरुवात केली. सभेत काम करण्यासाठी त्यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.

दरम्यान, पुढे हिशेब तपासणीस, सहसचिव आणि सचिव या पदांवर त्यांनी काम केले. अतिशय परिश्रमाने आणि आस्थेने त्यांनी हिंदी भाषेची व संस्थेची सेवा केली. सभेचे ते निष्ठावान प्रचारक होते. कुशल प्रशासक असा त्यांचा लौकिक होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheshrao Jagtap passed away