

₹37 Crore Independent Water Supply Scheme for Shewalewadi
Sakal
मांजरी : महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेवाळेवाडी गावाला सुमारे ३७ कोटी रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे आज (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे व माजी सरपंच प्रतिमा शेवाळे गेली वर्षभर यासाठी पाठपुरावा करीत होते.