

Shikrapur MIDC Gangster Suraj Dedage Detained Under MPDA Act After Six Serious Crime Cases Against Him
esakal
-भरत पचंगे
शिक्रापूर: औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या शिक्रापूर परिसरात दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अखेर एमपीडीए कायद्याचा दणका दिला. सुरज उर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर) याच्यावर पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.