

63424
शिरोडा : येथील घरावर शुक्रवारी छापा टाकणारे पोलिसांचे पथक.
63425 - सिद्धेश परब
माजी उपसभापतींच्या घरी
अमली पदार्थसदृश पदार्थ
शिरोड्यात छापा; शिवसेनेच्या सिद्धेश परब यांना अटक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) ता. ११ : येथील पोलिसांनी छापा टाकत शिंदे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या शिरोडा येथील घरातून आज सकाळी ५०४ ग्रॅम गांजासदृश पदार्थ आणि २.२६ ग्रॅम मेथामफेटामाईनसदृश पावडर जप्त केली. त्याची सुमारे ४७ हजार रुपये किंमत आहे. पोलिसांनी परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. शिरोडा येथे परब यांच्या घरात अमली पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात घराची झाडाझडती घेत असताना टेबलाखाली ठेवलेल्या एका बॅगेत १५ हजार रुपये किमतीचा ५०४ ग्रॅम गांजासदृश पदार्थ, ३३ हजार रुपये किमतीची २.२६ ग्रॅम वजनाची पांढरी मेथामफेटामाईन सदृश पावडर आढळली. पोलिसांनी दोन्ही पदार्थ जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.