esakal | Shirur: कुंड पर्यटन स्थळी असणारी दोन्ही श्री मळगंगा देवीचे मंदिर होणार खुले
sakal

बोलून बातमी शोधा

कुंड पर्यटनस्थळी असणारी दोन्ही श्री मळगंगा देवीचे मंदिर होणार खुले

कुंड पर्यटनस्थळी असणारी दोन्ही श्री मळगंगा देवीचे मंदिर होणार खुले

sakal_logo
By
युनुस तांबोळी

टाकळी हाजी: शारदीय नवरात्र उत्सवाला गुरूवार पासून ( ता. 7 ) प्रारंभ होत असून घटस्थापनेला व नवरात्रातही गणेशोत्सवा प्रमाणे निर्बंध राहतील. असे शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने काही गावे बंद ठेवण्यात आली आहेत.

त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात भाविकांसाठी मंदिरे खुली केली जाणार आहेत. परंतू गर्दी होऊ नये याची दक्षता मंदिर समिती व स्थानीक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. लहान मुले व जेष्ठ नागरिक दर्शनासाठी आल्यानंतर त्याची व्यवस्थान वेगळी करावी लागण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपुर्वी सर्वांनीच खबरदारी घेऊन नियमाचे तंतोतत पालन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: भाडेकरू ठेवताय...सावधान ! पोलिस स्टेशनला नोंद बंधनकारक

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी येथील श्री मळगंगा देवी, कवठे येमाई येथील श्री येमाई देवी, कान्हूर मेसाई येथील श्री मेसाई देवी येथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या शारदीय सोहळ्यासाठी राज्यातून भावीक येथे दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. घटस्थापनेच्या मुहुर्तावर मंदिरे खुली होणार असल्याने प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे गरजेचे आहे. गर्दी टाळून मास्कचा वापर करावा.

कोरोनाचा धोका अजूनही पुर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे यंदाही नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. दर्शनासाठी भावीकांना जाता येईल. परंतु सर्वाच्या सुरक्षिततेसाठी कोरोना संबधीत नियम पाळावे लागतील. सर्वाच्या सहकार्यातून नवरात्र उत्सव साजरा करण्यात व परिसर कोरोना मुक्त होईल. असा विश्वास आहे. - पोलिस निरीक्षक, सुरेशकुमार राऊत, शिरूर

असे असणार निर्बंध

  • सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकण्यास बंदी

  • रस्त्यावरील रहदारीस अडथळा नकोच

  • नवरात्र उत्सवानिमित्त सार्वजनिक मिरवणूका काढता येणार नाही.

  • मंदिर समिती व स्थानीक पोलिस ठाण्याचे अधिकारी करतील दर्शनाची व्यवस्था

  • मंदिराच्या जागेची उपलब्धता पाहून एकावेळी किती भावीकांना दर्शनासाठी सोडाये याचे नियोजन होईल.

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने भावीकांसाठी करून द्यावी. ऑनलाईन दर्शनाची सोय

loading image
go to top