esakal | PUNE: भाडेकरू ठेवताय...सावधान ! पोलिस स्टेशनला नोंद बंधनकारक
sakal

बोलून बातमी शोधा

room rent

भाडेकरू ठेवताय...सावधान ! पोलिस स्टेशनला नोंद बंधनकारक

sakal_logo
By
युनुस तांबोळी

रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती (ता. शिरूर ) परीसरात परराज्यातून नागरिक स्थायिक होत आहेत. यातील बहुतांश नागरिक, नोकरी व व्यवसायासाठी येतात. जागा भाडे तत्वावर घेऊन वास्तव्य करतात. मात्र काही अपप्रवृत्तीचे नागरिक भाडेतत्वावर राहून गुन्हा करतात आणि निघून जातात. त्यामुळे जागा मालकांनी भाडेकरू ठेवताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. भाडेकरूंची नोंद पोलिस ठाण्यात करणे बंधनकारक असून अद्याप नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी भाडेकरूची नोंद फायदेशिर ठरणार आहे.

हेही वाचा: ग्राऊंड रिपोर्ट: अतिवृष्टीच्या पुरात ‘हिरवं स्वप्न’ही गेलं वाहून

गेल्या दोन महिण्यात चोर, दुचाकी चोरटी, फुस लावून पळविणे, हरवले आहे, भाडे बुडविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लहान मुलांना धोका, कंपनीत चोरी, मोबाईल चोरी या सारखे प्रकार घडले आहेत. यातील काही आरोपी हे परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून येतात. या परिसरात भाडेतत्वावर राहून गुन्हा करतात ही बाब समोर आल्याने या भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रांजणगाव गणपती या परीसरात मोठ्या प्रमाणात घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार तसेच मजूर व लहान लहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबर या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकही राहतात. ते दिवसभर फिरून पहाणी करतात.

हेही वाचा: तक्रारवाडी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शंभर टक्क्यांनी सुरू

रात्री दुचाकी चोरणे, घरफोडी, मोबाईल चोरीचे प्रकार करतात. त्यानंतर ते त्यांच्या राज्यात निघून जातात. ज्यावेळी त्यांना अटक होते. त्यावेळी या परिसरात तो भाडेतत्वावर राहत असल्याचे पुढे येते. यासाठी या परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन भाडेकरूंची चौकशी करणे आवश्यक आहे. त्याबरोबर आपल्या इमारतीत कोण आणी किती भाडेकरू राहतात त्यांची ओळखपत्राची छायांकित प्रत पोलिस स्टेशनला जमा करावी. याची प्रत्येकाने अंमलबजावणी केली तर या परिसरात गुन्हेगारीला आळा घालता येईल. असे पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्याच्या रांजणगाव परिसरात औद्योगीक वसाहत मोठी असल्याने य़ा परिसरात भाडेतत्वार राहणाऱ्या कामगार व व्यवसायीकांची संख्या मोठी आहे. त्या संबधिताची सर्व नोंद पोलिस स्टेशनला होत नाही. घर मालकांनी ही नोंद करणे गरजेचे आहे. त्यांना ते बंधनकारक आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. - बलवंत मांडगे,पोलिस निरीक्षक रांजणगाव गणपती ( ता. शिरूर )

हे करणे बंधनकारक...

  • भाडेकरूंची माहिती घेणे

  • आधार कार्ड, पॅनकार्डची छायांकित प्रत घ्यावी

  • ज्या ठिकाणी भाडेकरू काम करतात तेथील ओळखपत्राची प्रत घेणे

  • पोलिस ठाण्यात भाडेकरूंनची नोंद करणे

loading image
go to top