

Shirur News Ranjangaon MIDC Police Detain Suspect in Alleged Sexual Assault Case Involving a Six Year Old Girl
esakal
शिरूर : खाऊच्या अमिषाने सहा वर्षांच्या चिमुरडीला घरात बोलवून अत्याचार करणाऱ्या नराधमाला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. रोहिदास दत्तात्रेय वाकचौरे (वय ६५, मूळ रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी दिली.