esakal | Shirur: मतदार संघात 27 हजार कोटींची कामे प्रस्तावित व काही झाली
sakal

बोलून बातमी शोधा

शिरुर

शिरुर : मतदार संघात 27 हजार कोटींची कामे प्रस्तावित व काही झाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : शिरुर लोकसभा मतदार संघात 27 हजार कोटींची कामे प्रस्तावित व काही झाली आहेत. यात रस्ते, रेल्वे व आरोग्याला प्राधान्य दिले आहे. कोविडमुळे जनसंपर्क कमी झाला होता. आता मात्र जनसंपर्का बरोबरच विधायक कामांनाही उपस्थित राहणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

नारोडी (ता. आंबेगाव) येथील लसीकरण व सातबारा भेट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाजार समितीचे चेअरमन देवदत्त निकम, भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, निलेश थोरात, तानाजी जंबुकर, नवनाथ हुले, सोपान घोडेकर, दिपक हुले, श्री मुक्तादेवी विकास संस्थेचे संतोष पिंगळे, गोरक्ष पिंगळे उपस्थित होते.

हेही वाचा: स्वपगारातून औषधी उद्यान उभारणीचा उपक्रम स्तुत्य : श्रीकांत पाटील

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, कोविड काळात सर्वसामान्य जनतेला 9 कोटी रुपयांपर्यंत मदत करण्यात यश आले. लहान मुलांचे हृदय शस्त्रक्रियेस 16 कोटी रुपये अर्थसहाय्य करण्यात आले. दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमाणेच सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. यावेळी माजी सरपंच नारायण पाटील हुले यांनी लोकसंपर्क वाढवावा तसेच गावाच्या श्रीमुक्तादेवी मंदीर सुशोभिकरणाला निधी देण्याची मागणी केली. यावेळी कोरोना काळात काम करणारे डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना सातबारा वाटप त्यांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नवनाथ हुले यांनी मानले.

loading image
go to top