Alcohol Seized : गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केला जप्त; दोन वाहने ताब्यात

परराज्यातून तुलनेने कमी दरात मद्य आणून महाराष्ट्रातील दराने विक्री करण्याचा तसेच रिकाम्या बाटल्यांमध्ये मद्य भरून ते संबंधित कंपनीचेच असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न.
Alcohol Seized

Alcohol Seized

sakal

Updated on

शिरूर - गोवा राज्यातील विदेशी मद्य महाराष्ट्रात आणून त्याची चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला २५ लाख ५१ हजार सहाशे पन्नास रुपयांचा मद्यसाठा शिरूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. कारेगाव-करडे रस्त्यालगत वृंदावन मंगल कार्यालयाजवळ गुरूवारी (ता. ३) पहाटे दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मद्य वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com