
वाघोली - शिरूर-हवेली विधानसभेची प्रथमच निवडणूक लढविणार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी पुणे जिल्हा ग्रामीण नऊ मतदार संघापैकी ७४,५५० मतांची आघाडी घेत अशोक पवार यांचा पराभव केला. कटके आघाडी घेण्यात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघात पाचव्या क्रमांकावर आहेत. अजित पवार हे १००८९९ मतांची आघाडी घेत ग्रामीण मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.