

Gold Chain Theft in Shirur Two Women Allegedly Use Sleight of Hand to Steal Jewellery Worth Over 2 Lakh Rupees
esakal
शिरूर : येथील सराफ बाजारातील एका सोन्या - चांदीच्या दुकानात सोनसाखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी हातचलाखीने सुमारे सव्वादोन लाख रूपये किंमतीची सोनसाखळी चोरून नेली. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या प्रकाराने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. याबाबत राजेंद्र अरूण लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला. या महिलांनी बुरखा घातलेला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.