

Shirur Diwali Celebrations Shine Bright with Traditional Lakshmi Pujan Rituals at Jewellery Shops and Commercial Markets
esakal
शिरूर : नोटा, दागिने, धनधान्यासह लक्ष्मीच्या असंख्य प्रतिकांचे पूजन... शाही वस्त्रालंकारांनी सजलेले कुटूंबिय... कुठे वह्यांची पूजा तर कुठे गादी पूजन... सनईचे मंजूळ सूर आणि मंत्रोच्चारासह भजन, आरतीचे सुश्राव्य स्वर... दिवाळीतील महत्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाचा शाही सोहळा शहरातील बाजारपेठा आणि विशेषतः सराफ कट्ट्यावर विशेषत्वाने रंगला.