शिरूरकरांसाठी महत्त्वाची बातमी : उद्यापासून सुरू होणार लाॅकडाउन...

नितीन बारवकर
Tuesday, 15 September 2020

शिरूर शहरातील सर्व कुटुंबांची बुधवारपासून (ता. 16) दोन दिवस तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने दोन दिवस शहरात लॉकडाउन जाहीर केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत दहा प्रभागातील नागरिकांच्या तपासणीसाठी तीनशे स्वयंसेवक नेमले असून, त्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले आहे.

शिरूर (पुणे) : शिरूर शहरातील सर्व कुटुंबांची बुधवारपासून (ता. 16) दोन दिवस तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने दोन दिवस शहरात लॉकडाउन जाहीर केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत दहा प्रभागातील नागरिकांच्या तपासणीसाठी तीनशे स्वयंसेवक नेमले असून, त्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळतील, त्यांचे विलगीकरण करून तातडीने उपचार सुरू केले जातील. गोळ्या-औषधांची गरज असणाऱ्यांना त्या जवळच्या जवळ व विनामूल्य मिळाव्यात यासाठी शहरातील मुंबई बाजार शाळा, लाटे आळी शाळा, ग्रामीण रुग्णालय, आरएमडी स्कूल, नवीन नगर परिषद इमारत अशा पाच ठिकाणी जनता दवाखाने सुरू केले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या तपासणीअंतर्गत ताप, ऑक्‍सिजन पातळी व इतर आजार तपासले जाणार असून, कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने अँटिजेन टेस्ट केली जाईल. सकाळी केलेल्या टेस्टचा अहवाल संध्याकाळी लगेच प्राप्त होणार असल्याने पुढील उपाययोजना सुलभ होतील, असे मुख्याधिकारी रोकडे यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur locked down for two days