Shirur Lok Sabha : पिक्चर अभी बाकी हैं ; अमोल कोल्हे

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळरावांनी संसदेत स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयीच प्रश्न विचारले होते, असा आरोप केला होता.
Shirur Lok Sabha
Shirur Lok Sabhasakal

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळरावांनी संसदेत स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयीच प्रश्न विचारले होते, असा आरोप केला होता. यानंतर आता कोल्हे यांनी थेट पुरावे सादर करत आढळरावांना कोंडीत पकडत, ‘‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी हैं,’’ असं ठणकावून सांगितलं आहे.

ओतूरच्या सभेत डॉ. कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आढळरावांना लक्ष्य करत, ‘‘हे तर लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी,’’ असा थेट आरोप केला होता. त्यानंतर आढळरावांनी ‘‘पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्या’’, असे आव्हान दिले होते. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारल्याचे सांगत, ‘‘शब्द फिरवत माघार घ्यायची नाही’’, असे प्रतिआव्हान आढळरावांना दिले होते. त्यानंतर आज डॉ. कोल्हे यांनी पुरावे दाखविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला अन् व्हायरल झाला आहे.

आढळरावांनी लोकसभेत ७ एप्रिल २०१७ आणि १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे कोल्हे यांनी दाखविली आहेत. आढळरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला? असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असे प्रती आव्हानही कोल्हे यांनी दिले आहे.

Shirur Lok Sabha
Loksabha Election Voting : मतदानासाठी उद्या कामगारांना पगारी सुट्टी

तसेच ‘‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’’, असे म्हणत १७ मार्च २०१७, ९ डिसेंबर २०१६ आणि २६ डिसेंबर २०१८ या तारखांना कंपनी हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली. सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवीत हे सगळे पुरावे टप्प्याटप्प्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत, कोल्हे यांनी आढळरावांचे टेन्शन वाढविले आहे.

शिरूरमध्ये नवा ट्विस्ट

शिरूरसारख्या ग्रामीण मतदारसंघातल्या तत्कालीन खासदार आढळरावांनी संरक्षण विभागाला डिफेन्स पार्टस पुरविणाऱ्या कंपनीचे प्रश्न विचारल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. आता आढळराव कसा ‘डिफेन्स’ करणार?, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावाखेड्यातले, शेतीमातीचे प्रश्न सोडून आढळराव भलतेच प्रश्न लोकसभेत मांडत असताना आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आढळराव-कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com