Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शिरूरकरांचा ठाम पाठिंबा; पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाने वाहतूक विस्कळीत
Shirur backs Manoj Jarange with a road blockade for Maratha reservation.

Shirur backs Manoj Jarange with a road blockade for Maratha reservation.

Sakal

Updated on

शिरूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी शिरूरकर नागरीकांनी आज शिरूर शहरात रास्ता रोको आंदोलन केले. मनोजदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं... अशा घोषणा देत आलेल्या समाजबांधवांनी शहरातून जाणाऱ्या पुणे - अहिल्यानगर रस्त्यावर पाबळ फाटा येथे ठिय्या दिला. सुमारे तासाभरापेक्षा अधिक काळ रस्ता रोखून धरल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com