esakal | मी, शरद पवार यांच्यासोबतच: अशोक पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ashok pawar

राज्यात काही घडामोडी झाल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी आहे, अशी प्रतिक्रिया शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आज (शनिवार) दिली.

मी, शरद पवार यांच्यासोबतच: अशोक पवार

sakal_logo
By
शरद पाबळे

कोरेगाव भीमा (पुणे) : राज्यात काही घडामोडी झाल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी आहे, अशी प्रतिक्रिया शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आज (शनिवार) दिली.

अशोक पवार हे कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी जयपूरला गेले होते. जयपूर येथून ते आज सकाळी परत आले. राज्यातील घडामोडीनंतर ते तत्काळ मुंबईला रवाना झाले. काही घडामोडी झाल्या तरी मी पक्षनेते शरद पवार यांच्याच सोबतच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ'ची बोलताना दिली. मुंबईत पोचल्यानंतर सर्वप्रथम ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

loading image