
गुनाट : ‘घोड’मधील ‘काळ्या सोन्या’चा अवैध उपसा या मथळ्याखाली दैनिक सकाळमध्ये वृत्तप्रसिद्ध होताच शिरूर महसूल प्रशासन मंगळवारी (ता. १२) ॲक्शन मोडवर येत घोड धरणातील अवैध वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. या कारवाईत स्फोटकांच्या साह्याने आठ फायबर तर सहा सेक्शन अशा १४ चौदा बोटी नष्ट केल्या. या कारवाईत बोटींचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.