Shirur Accident : शिरूर-न्हावरे रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

Shirur Nhavare road accident bike tractor trolley : शिरूर-न्हावरे रस्त्यावर उसाने भरलेल्या, रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirur Nhavare road accident bike tractor trolley

Shirur Nhavare road accident bike tractor trolley

sakal

Updated on

न्हावरे : शिरूर-न्हावरे रस्त्यावर न्हावरे नजिकच्या हॉटेल महाराजाजवळील रस्त्यावर उभ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकून दुचाकी वरील युवकाचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातास कारण ठरलेल्या अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत सार्थक बाळासाहेब शेरकर (वय १९, सध्या रा. सरदवाडी, ता.शिरुर, मूळ रा. तराळवाडी, ता.पारनेर, जि. अहिल्यानगर) या तरुणाचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com