Drunk Truck Driver: मद्यधुंद ट्रकचालकाची चालत्या वाहनातून उडी; चालकाविना ट्रक घरावर धडकला, मुलांची प्रसंगावधानाने सुटका

मद्यधुंद ट्रकचालकाने भरधाव लोखंडी सळयांचा ट्रक नागमोडी चालवत मोटारीला धडक दिल्यानंतर चालत्या ट्रकमधून उडी मारत पळ काढला; चालकाविना सुटलेला ट्रक अण्णापूरमध्ये इमारतीवर जाऊन आदळला, सुदैवाने जीवितहानी टळली
Annnapur, Shirur: A speeding truck loaded with iron rods crashed into a roadside building after the driver reportedly jumped out of the moving vehicle. No casualties were reported.

Annnapur, Shirur: A speeding truck loaded with iron rods crashed into a roadside building after the driver reportedly jumped out of the moving vehicle. No casualties were reported.

Sakal

Updated on

शिरूर : लोखंडी सळयांनी भरलेल्या आणि भरधाव चाललेल्या ट्रकचा प्रथम पुढे चाललेल्या एका मोटारीला धक्का लागला... मात्र तशाही अवस्थेत चालकाने ट्रक तसाच पुढे दामटला... दरम्यान काही दूचाकीस्वार आपला पाठलाग करीत आहेत, असा संशय बळावलेल्या ट्रकचालकाने अत्यंत धोकादायक पद्धतीने इतर वाहनांना मागे टाकत ट्रक जोरात पुढे नेला आणि काही कळायच्या आत चालत्या ट्रकमधून बाहेर उडी घेतली... चालकाविना अनिर्बंध झालेला हा ट्रक काही अंतरावर गेला आणि नंतर रस्ता सोडून खाली उतरत एका इमारतीवर जाऊन धडकला... शिरूर - पाबळ रस्त्यावरील या थरारामध्ये जिवितहानी झाली नसली; तरी घराकडे ट्रक येताना पाहून पायरीवर खेळत बसलेली मुले प्रसंगावधान राखत घरात पळाल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com