नागरगावात पाच गावठी हातभट्ट्यांवर शिरूर पोलिसांनी टाकले छापे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

गावठी दारू बनविण्यासाठीचा सुमारे ३२ हजार रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून, चार बॅरल भरून तयार गावठी दारू घटनास्थळाहून नष्ट करण्यात आली  आहे.

शिरूर : नागरगाव (ता. शिरूर) येथे काही घरांमधून चालू असलेल्या पाच गावठी हातभट्ट्यांवर शिरूर पोलिसांनी शनिवारी(ता.२४) पहाटेच छापे टाकले. या भट्ट्या महिला चालवीत असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी पाच महिलांविरूद्ध गुन्हे दाखल करून दोघींना अटक केली. पोलिस कारवाईची चाहूल लागताच अनेक दारूधंदेवाले पळून गेले. तरीही पोलिसांनी परिसरातील अनेक भट्ट्या उध्वस्त केल्या. 

वत्सला दिलिप गव्हाणे, सारीका पप्पू कोळेकर, यल्लाबाई दशरथ कोळेकर, बबई चौगुले व एका अनोळखी महिलेसह दिलिप दिगंबर गव्हाणे, पप्पू दशरथ कोळेकर, मच्छिंद्र दशरथ कोळेकर (सर्व रा. नागरगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध शिरूर पोलिसांनी बेकायदा हातभट्टी दारू तयार करणे, बाळगणे व विकणे या कलमांखाली गुन्हे दाखल केले असून, दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली. गावठी दारू बनविण्यासाठीचा सुमारे ३२ हजार रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून, चार बॅरल भरून तयार गावठी दारू घटनास्थळाहून नष्ट करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरगाव परिसरात काही घरांतून गावठी दारू तयार केली जात असल्याची व मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असल्याची माहिती समजल्याने पोलिस निरीक्षक खानापुरे व सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी करणसिंग जारवाल, राजेंद्र गोपाळे, सागर गुणवरे, प्रवीण पिटले व शितल गवळी या पोलिस पथकासह शनिवारी(ता.२४) पहाटे साडेपाचच्या सुमारास खासगी वाहनाने नागरगाव येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूभट्ट्यांवर छापे टाकले. पोलिसांची चाहूल लागल्याने दारू गाळणारे अनेकजण पळून गेले. वत्सला गव्हाणे व सारीका कोळेकर यांना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अन्वये पाच महिलांसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. 
 
''बेकायदा हातभट्टी दारूधंद्याविषयी कठोर कारवाईची मोहिम हाती घेतली असून, समाजाला लागलेली ही कीड उखडून टाकण्यासाठी पोलिस दल सक्षमपणे, कुठलीही भिडभाड न ठेवता ठोस कारवाई यापुढे करणार आहे. दारू धंद्येवाल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून हद्दपारीसारखी कारवाई देखील केली जाईल. महिलांना पुढे करून हे धंदे केले जात असले; तरी खरे गुन्हेगार हुडकून काढून त्यांना सडकून काढले जाईल. छाप्यावेळी किंवा घटनास्थळी महिला, मुले कुणीही सापडले; तरी कुठलीही भिडभाड न ठेवता गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल.''
-   प्रवीण खानापुरे , पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन. 

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur police raided five Desi brewery in Nagargaon on Saturday