शिरूर-पुणे मार्ग आठपदरी होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

शिरूर - ‘‘शिरूर- पुणे या राज्य मार्गावरील वाहतूक समस्येचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी हा मार्ग ‘नॅशनल हायवे’कडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. आठपदरीसह या रस्त्याच्या संपूर्ण कामासाठी सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या दळणवळण मंत्रालयाने मान्यता दिली आहे,’’ अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, बायपास, फ्लायओव्हर आदी महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात वाघोली ते शिक्रापूर आणि त्यापुढील टप्प्यात शिरूर पर्यंतच्या मार्गाचा या प्रकल्पात समावेश असून, आठपदरीचे नियोजन आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. या प्रकल्पासाठी निधीची कुठलीच अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहितीही आढळराव पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘शिरूर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारने वाघोली ते शिक्रापूर या मार्गासाठी ‘हायब्रीड ॲन्युइटी’ अंतर्गत सव्वादोनशे कोटी रुपये मंजूर केले होते. पण तेवढ्याने हे काम होणार नाही. या मार्गावरील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. हा रस्ता ‘नॅशनल हायवे’कडे हस्तांतरित केला जात आहे.

Web Title: Shirur Pune Highway Development