Shirur Wrestling Competition : शिरूरमध्ये २८ आणि २९ नोव्हेंबरला रंगणार रघुनाथ सुवर्ण केसरी कुस्ती स्पर्धा; सिकंदर शेख, साहिल कोहलीसह नामांकित मल्लांचे सामने

Raghunath Suvarna Kesari Wrestling Tournament in Shirur : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने शनिवारी आणि रविवारी शिरूरमध्ये रघुनाथ सुवर्ण केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार आहे.
Raghunath Suvarna Kesari Wrestling Tournament in Shirur

Raghunath Suvarna Kesari Wrestling Tournament in Shirur

esakal

Updated on: 

शिरूर : दिवंगत उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 'रघुनाथ सुवर्ण केसरी' स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक पैलवान अशोक पवार यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील चार व अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन अशा सहा तालुक्यांसाठी ही स्पर्धा असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या मल्लांच्या प्रदर्शनीय कुस्त्या पाहण्याची संधी देखील मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Loading content, please wait...