

Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Sakal
शिरूर : या चौकाचा गणपती, त्या गल्लीचा गणपती, शेजारी - शेजारी दोन मंडळांच्या गणपतीचे मंडप आणि एका मंडळात वाद झाल्याने फुटून त्याच परीसरात दुसऱ्या मंडळाची स्थापना असे चित्र सार्वजनिक गणेशोत्सवात सर्रास दिसत असताना महागणपतीच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या रांजणगाव गणपती (ता. शिरूर) व परीसरातील तब्बल २५ गावांत आजही 'एक गाव एक गणपती' हीच प्रथा पाळली जाते. शेकडो वर्षांची ही प्रथा स्थानिक ग्रामस्थांनी मनोभावे जपली असताना वाढत्या औद्योगिकरणाच्या निमीत्ताने वाढलेल्या लोकवस्तीतूनही महागणपतीलाच आराध्य दैवत मानून गणेशोत्सव साजरा केला जातो.