

toxic spill threatens farmland and drinking water
sakla
तळेगाव ढमढेरे : कासारी (ता. शिरूर) येथील शासकीय तळ्याच्या शेजारी असलेल्या पडीक जमिनीत अज्ञात टँकरद्वारे रात्रीच्या वेळी रसायनयुक्त पाणी सोडल्याने प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित झाला असून पाणी सोडणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. येथील शेतकरी शिवाजी काळकुटे यांच्या शेताशेजारील पडीक जमिनीत रात्रीच्यावेळी अज्ञात टँकरमधून रसायनयुक्त पाणी सोडल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी रसायनयुक्त पाणी सोडले जाते त्या ठिकाणचे गवत पूर्णपणे जळून गेले असून जमिनीला भेगाही पडलेल्या आहेत.