

Pune-Satara Highway Crash Kills Four Maval Youths Near Shirwal
Esakal
शिरवळ ता . ११ : पुणे -सातारा महामार्गावरील शिरवळमध्ये मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली. या अपघातात मावळ तालुक्यातील १९ ते २० वर्षांची चार तरुण मुलं जागीच मृत्यूमुखी पडली तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये हा अपघात झाला. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.