झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा; शिवनेरीवर शिवजन्म सोहळा उत्साहात

Shiv Jayanti
Shiv Jayantiesakal
Summary

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा झाला. गेल्या काही वर्षांपासून शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळणा जोजवला जातो. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्मसोहळ्याला उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेसुद्धा शिवजन्म सोहळ्यासाठी शिवनेरीवर आले होते.

आज शिवजयंती साजरी करत असताना आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे, त्यांचे विचार कसे आत्मसात करू शकतो, शिवरायांच्या स्वराज्यातून आपण काय घ्यायला हवं हे पाहण्याची आज गरज आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. शिवनेरीवर येण्यापासून लोकांना थांबावं लागत आहे. केवळ निमंत्रितांनाच या सोहळ्याला उपस्थित राहण्यास परवानगी असते. त्याबाबत संभाजीराजेंना विचारले असता ते म्हणाले की, इथली इतर परिस्थिती आणि याआधी एकदा हेलिकॉप्टरवर दगडफेकीची घटना झाली होती त्यामुळे काही बंधने आहेत.

Shiv Jayanti
शिवजयंती : पुण्यवंत, सामर्थ्यवंत! नीतिवंत, जाणता राजा!

मुंबईत शिवाजी पार्कवर शिवजयंती

शिवजयंतीच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com