पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या लाचखोरी विरोधात शिवसेनेचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. भाजपच्या लाचखोरी विरोधात शिवसेनेचे आंदोलन महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सुरू आहे. 'चोर भाजप, दरोडेखोर भाजप', 'लूटमार नही चलेगी', 'महापालिका, स्थायी समिती बरखास्त करा' अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत.

लाचप्रकरणी एसीबीने महापालिकेतून स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे  (संगणक चालक),  अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना अटक केली आहे. याविरोधात शिवसेनेचे शुक्रवारी महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू आहे.

खासदार  श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत को-हाळे, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

नही चलेगी नही चलेगी लूटमार नही चलेगी, चोर भाजपा, डाकू भाजपा, दरोडेखोर भाजपा, बरखास्त करा बरखास्त करा महापालिका बरखास्त करा, भ्रस्ट भाजपचे करायचे काय, खाली डोके वर पाय, करदात्या नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या भाजप नगरसेवकांचा धिक्कार असो, पैसे नागरिकांच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे" असा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा: ..तर कार विकून टाकेल : कुलगुरू

दरम्यान, महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोन वाजता आहे. लाच प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू आहे. शिवाय, सभागृहातही ते लाच प्रकणावरूनच सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप सर्वसाधारण सभेबाबत काय भूमिका घेणार?, सभा होणार की काही तरी निमित्त करून तहकूब करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक प्रकारे भाजपसाठी शुक्रवार सत्त्वपरीक्षेचा ठरणार आहे.

Web Title: Shiv Sena Agitation Against Bjp Bribes In Pimpri Chinchwad Municipal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..