..तर कार विकून टाकेल : कुलगुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

..तर कार विकून टाकेल : कुलगुरू

..तर कार विकून टाकेल : कुलगुरू

पुणे : ‘‘वेळच्या वेळी बससेवा मिळाली तर... मी माझी कार विकून टाकेल आणि बसनेच प्रवास करायला सुरवात करेल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. निमित्त होते, ‘पीएमपीएमएल’च्या सर्वेक्षणाचे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पीएमपीएमएल यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार विद्यापीठाचे विद्यार्थी बससेवे विषयी समस्यांबाबत सर्वेक्षण करत आहेत. विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील एकूण २० विद्यार्थी विविध वयोगटातील तसेच विविध आर्थिक स्तरातील नागरिकांचे ‘पीएमपीएमएल’च्या सुविधांबाबत सर्वेक्षण करत आहेत. यानिमित्ताने मधुरा गुंजाळ या विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या कुलगुरूंचा ‘तुम्हाला वेळच्या वेळी बससेवा मिळाली तर...’ असा प्रश्न विचारला. त्यावर दिलखुलासपणे उत्तर देताना, ‘अशी सेवा मिळाल्यास मी कार विकेल आणि बसनेच प्रवास करेल’, असे उत्तर डॉ. करमळकर यांनी दिले.

हेही वाचा: उतारवयात ज्येष्ठांची जगण्यासाठी धडपड

पुण्यातील तीन हजार आणि पिंपरी-चिंचवडमधील दोन हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये सार्वजनिक बसने प्रवास करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच नवीन सुविधांबाबतही नागरिकांची मते जाणून घेण्यात येत आहेत. हे सर्वेक्षण समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे आणि स्त्री अभ्यास केंद्र संचालक डॉ. अनघा तांबे यांच्या पुढाकाराने होत आहे.

‘‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आत्तापेक्षा अधिक अधिक सक्षम झाल्यास रस्त्यावरील वैयक्तिक वाहनांची संख्या कमी होईल. याचा पर्यावरणाला नक्कीच फायदा होईल. सर्वेक्षणाच्या कामासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा वाटा आहे, ही अत्यंत कौतुकाची बाब आहे.’’

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Vice Chancellor Dr Nitin Karmalkar Said He Will Sell Car And Travel Bus Pmpml Survey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..