

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : शिवसेनेचे (यूबीटी) ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी पूर्णेकर कुंटुबीयांनी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणीस उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला. तसेच नियमित खंडपीठाकडे दाद मागण्याचेही स्पष्ट केले.
तपासाच्या या टप्प्यावर हस्तक्षेप करण्याची गरज काय, असा प्रश्न न्या. अद्वैत सेठना आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने उपस्थित केला. हे काय सुरू आहे, तुम्हाला सुट्टीच्या काळात तपास दुसऱ्याकडे सोपवायचा आहे, तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल करण्यासाठी अजून ४५ दिवसांहून अधिक कालावधी शिल्लक असल्याचेही निरीक्षणही सुट्टीकालीन खंडपीठाने नोंदवले. ही घटना घडून केवळ ३७ दिवस झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यावर सध्याच्या तपासावरून न्यायाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नसल्याचे पूर्णेकर कुटुंबीयांकडून न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. सादर केलेल्या महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष होत असून, या पुराव्यांतून अटक केलेल्या संशयितांसोबत खऱ्या सूत्रधाराचा संबंध दिसत असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला. त्यामुळे तपास दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवण्याची मागणीही पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रकरणाच्या या टप्प्यावर सुट्टीकालीन न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नियमित न्यायालयाकडे पुन्हा याचिका सादर करण्याची मुभा दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.