

Immediate Relief: Shiv Sena Leaders Visit Storm-Hit Lakhangaon
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात अवकाळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखणगाव परिसरात सामान्य नागरिकांच्या घरांची पडझड, पोल्ट्री शेड, गोठे तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज शनिवारी सकाळी शिवसेना नेते रमेश येवले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण गिरे, युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच रमेश येवले यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाना व परिसरातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.