esakal | 'आमचं ज्ञान कमी असेल'; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena mp sanjay raut statement chandrakant patil apj abdul kalam

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या चुकीच्या संदर्भाविषयी संजय राऊत यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, 'डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करणं हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मास्टरस्ट्रोक होता.'

'आमचं ज्ञान कमी असेल'; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Pune News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमा दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी चुकीचा संदर्भ दिला होता. त्यावरून सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील प्रचंड ट्रोल झाले. आज, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळं पाटील यांचं हसं होतंय, असं खासदार राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यातील वाक् युद्ध सातत्याने चर्चेत असते. आज, राऊत यांनी त्यात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय.

आणखी वाचा - पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार

काय म्हणाले राऊत?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या चुकीच्या संदर्भाविषयी संजय राऊत यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, 'डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करणं हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मास्टरस्ट्रोक होता. त्यात प्रमोद महाजन यांचाही वाटा होता. डॉ. अब्दुल कलाम सर्वमान्य उमेदवार व्हावेत, यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. वाजपेयींनी त्यावेळी डॉ. कालम यांचे नाव पुढे केले होते. माझ्या ज्ञानानुसार त्यावेळी नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते. कदाचित आमचं ज्ञान कमी असेल. पण, अशाप्रकारच्या वक्तव्यामुळं त्यांचं हसं होतंय.'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पुण्यात भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित 'युवा वॉरियर्स कार्यक्रमात बोलताना, चंद्रकांत पाटील म्हणाले, '? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना प्राधान्य दिले. मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते. मुस्लिम म्हणून नव्हे तर, डॉ. कलाम यांना संशोधक म्हणून संधी दिली होती.' यानंतर चंद्रकांत पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चंद्रकांत पाटील यांना यावरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

loading image