बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध

कर्वे रस्त्यावर नळ स्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी, पाणी समस्या व बालगंधर्व नाट्यमंदिर पुनर्विकास या तीन गोष्टींवर सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे.

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध

शिवाजीनगर - शहरातील सध्या चर्चेत असलेले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे कर्वे रस्त्यावर नळ स्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी, पाणी समस्या व बालगंधर्व नाट्यमंदिर पुनर्विकास या तीन गोष्टींवर सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे. वाहतूकीला गती येईल या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्च करून नळ स्टॉप चौकात उड्डाणपूल बांधला. मात्र, वाहतूकीला गती मिळण्याऐवजी वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. यामुळे पुण्याच्या पश्चिम भागात जाणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबरोबर स्थानिक रहिवासी, व्यावसायिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. त्याच बरोबर पेठा व उपनगरात पाणी समस्या भेडसावत असताना, दूरूस्तीच्या नावाखाली पाणीकपात केली जाते.

२४×७ पाणीपुरवठा योजना म्हणजे पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील पुणेकरांच्या पदरी पाणी समस्या राहिली आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी उपायोजना कराव्यात. अन्यथा, पुणे शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर हांडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. यासह बालगंधर्व रंगमंदिर न पाडता उर्वरित जागेवर नाट्यगृह बांधण्यास शिवसेनेचा विरोध नाही, मात्र रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने पुणेकरांवर लादला तर शिवसैनिक पुणेकरांच्या वतीने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत. असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, माजी गटनेते शिवसेना पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख गजानन थरकुडे, प्रशांत बधे, शाम देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena Opposes Demolition Of Balgandharva Rangmandir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top