

सोबत पासपोर्ट. भगवानराव दराडे.
तालुकाप्रमुखपदी दराडेंची फेरनिवड
शिवसेना ठाकरे गटाची तालुका कार्यकारिणी जाहीर
पाथर्डी, ता. १५ ः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुका प्रमुख म्हणून भगवानराव दराडे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व रामदास गोल्हार यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली होती. या यादीला ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
निवडलेले पदाधिकारी व पदे पुढीलप्रमाणे. तालुका प्रमुख- भगवानराव दराडे, उपजिल्हा समन्वयक- वसंत खेडकर, तालुका समन्वयक- रामकिसन भिसे, तालुका संघटक- सागर राठोड, विधानसभा समन्वयक- दत्तू कोरडे, उपजिल्हा संघटक- यमाजी भिसे, उपतालुका समन्वयक- बबन शेळके, उपतालुका संघटक- संजय शिरसाट, नितीन अंदुरे.
टाकळी मानूर गट-गणात उपतालुकाप्रमुख- केशव खेडकर, उप तालुकासमन्वयक प्रमुख-बबन लोभा चव्हाण, विभागप्रमुख- चंद्रकांत शेळके, उपविभाग प्रमुख- उद्धव केदार व कृष्णा आघाव, गटप्रमुख- साहेबराव काळे व अशोक कान्हू दहिफळे, उपगटप्रमुख- ज्ञानेश्वर कैलास बेळगे व अमोल बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भालगाव-अकोला गट-गण उपतालुकाप्रमुख-बाळासाहेब खेडकर, उपतालुका समन्वयक पोपट रोकडे, विभागप्रमुख आजिनाथ धायतडक, उपविभागप्रमुख अप्पासाहेब ढाकणे व दत्तात्रय दातीर, गटप्रमुख शरद वारे व प्रवीण दहिवाळ.
कासार पिंपळगाव गट-गण- उपतालुकाप्रमुख- रामदास दराडे, उपतालुका समन्वयक- नवनाथ वाघ, विभागप्रमुख गौतम वाघ, उपविभागप्रमुख- सुनील मुखेकर व संदीप रघुनाथ जगताप, विभाग समन्वयक- राजेंद्र दगडू खेडकर, गटप्रमुख- अंकुश रामराव आव्हाड व अशोक सातपुते.
माळीबाभूळगाव गट-गण- उपतालुकाप्रमुख बाळासाहेब केंदळ, विभागप्रमुख बाळासाहेब सातपुते, उपविभागप्रमुख गणेश भापसे, गटप्रमुख बाळासाहेब उत्तम कराळे व भीमसिंग अकोलकर, उपगटप्रमुख उद्धव बबन चोथे.
मिरी-करंज गट-गण- उपतालुकाप्रमुख- भागीनाथ गवळी, विभागप्रमुख अरुण गिते, उपविभागप्रमुख सुरेश बर्फ व शरद चांगदेव लोंढे, गटप्रमुख एकनाथ आढाव व शुभम गिते, उपगटप्रमुख शरद गवळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.