राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याविरोधात शिवसैनिक उपोषणाला बसणार

सुदाम बिडकर
Saturday, 29 August 2020

शिवसेनेच्या वतीने बुधवार (ता. 2 सप्टेंबर) तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य व माजी उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी तहसीलदारांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात प्रशासनाला कोरोनो परिस्थिती हातळण्यात अपयश आले असून, तालुक्यात कोरोनो रुग्णांचा आकडा एक हजारांपर्यंत गेला आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सीजन व व्हेंटिलेटर सुविधा न मिळाल्याने मृत्यू होत आहे. त्यामुळे तालुक्यात तत्काळ मिनी जंबो कोविड सेंटर उभारावे, या मागणीसाठी तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवार (ता. 2 सप्टेंबर) तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य व माजी उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी तहसीलदारांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

पुण्यात आज पावसाचा इशारा

याबाबत करंजखेले यांनी सांगितले की, तालुक्यात कोरोनाने 27 रुग्णांचा मुत्यू झाला आहे. एकुण रुग्णांची संख्या एक हजांरापर्यंत पोचली आहे. त्यामध्ये दररोज सरासरी 50 ते 75 च्या संख्येने वाढ होत आहे. उपलब्ध सुविधा अपुरी पडत आहे. प्रशासनास कोरोनो परिस्थिती हातळण्यात अपयश आले आहे. तालुक्यात तत्काळ मिनी जंबो कोविड सेंटर उभारावे, किमान 100 ऑक्सीजन व व्हेंटीलेटरयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करावी, कोरोनो चाचण्यांची संख्या वाढवावी, तज्ज्ञ डॉक्टरांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, तालुक्यातील खासगी रुग्णालय इतर आजाराचे रुग्ण नाकारतात. त्यांच्यावर अंकुश ठेवावा. तसेच, खासगी रुग्णालयांना प्रशासनाने त्रास न देता सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आढावा बैठक सोडून काहीही उपाययोजना करत नाही. त्यांनी नुसतीच प्रशासनाची आढावा बैठक न घेता तालुक्यातील इतर लोकप्रनिधींसमवेत बैठक घ्यावी.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या मागण्यांकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घोडेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी दिले असल्याचे करंजखेले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena warns of agitation in Ambegaon taluka