पुण्यातही शिवसेना भवन उभारणार - नाना भानगिरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Bhangire

मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातही शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शिवसेना भवन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी माहिती दिली.

पुण्यातही शिवसेना भवन उभारणार - नाना भानगिरे

पुणे - मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातही शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शिवसेना भवन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी माहिती दिली.

शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे. भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला गट सक्षम करण्यास प्राधान्य दिले आहे. शिंदे यांनी मुंबईत शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पुणे शहरातही नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना भवन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे.

त्यानुसार शनिवारी (ता. १३) शहराध्यक्ष भानगिरे, सह संपर्कप्रमुख अजय भोसले, शिवाजीनगर विधानसभा प्रमुख संजय डोंगरे, खडकवासला विभाग प्रमुख नीलेश गिरमे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात शिवसेना भवनच्या इमारतीची पाहणी केली.

या संदर्भात भानगिरे म्हणाले, शिवसैनिक आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे संपर्क भवन सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जाईल. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचेही निवारण करण्यात येईल. येत्या दोन आठवड्यात हे शिवसेना भवन कार्यालय सुरू होईल.

Web Title: Shiv Sena Will Build Bhawan In Pune Nana Bhangire Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv Senapune