राजा शिवछत्रपती महाद्वार लोकार्पण सोहळ्या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम

खासादार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार लोकार्पण
राजा शिवछत्रपती महाद्वार लोकार्पण सोहळ्या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम

नारायणगाव : लोकसहभागातून सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून जीर्णोद्धार केलेल्या येथील शिवकालीन राजा शिवछत्रपती महाद्वार या पूर्व वेश प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा ५ जानेवारी २०२२ रोजी खासादार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न होत आहे.या निमित्त ग्रामस्थांच्या वतीने ३ जानेवारी ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आशी माहिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

नारायणगाव शहराला शिवकालीन ऐतिहासिक व धार्मिक वसा व वारसा लाभला आहे. दगडी चिरेबंदी बांधकाम असलेली शिवकालीन पूर्व व पश्चिम वेस नारायणगावचे वैभव आहे.काळाच्या ओघात पडझड झालेल्या पूर्व वेशीचा जीर्णोद्धार करून शिवकालीन पाऊलखुणांचे जतन करण्याचा निर्णय सरपंच पाटे यांच्या उपस्थितीत एक वर्षापूर्वी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला होता.वेशीचा पायाच्या आराखड्यात बदल न करता वरच्या भागांचे सुशोभिकरणं करण्याचे नियोजन करण्यात आले.या साठी वास्तू विशारदा कडून आराखडा तयार करण्यात आला होता. एक वर्षा पूर्वी सुरू केलेले काम पूर्ण झाले आहे.

राजा शिवछत्रपती महाद्वार लोकार्पण सोहळ्या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम
सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

वेशीच्या नवीन संरचनेमध्ये सत्तर वर्ष आयुष्य असलेल्या फायरप्रुफ फायबर चा वापर करण्यात आला आहे. जुन्या बांधकामाच्या रचनेला धोका पोहोचू नये यासाठी फायबर मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. पन्नास फूट लांब व वीस फूट रूंद हॉल तयार करण्यात आला असून पस्तीस फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.वेशीला पाच घुमट तयार करण्यात आले असून या पैकी मधल्या घुमटात तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.सर्व बांधकामाला ऐतिहासिक लूक देण्यात आला आहे.या मुळे नारायणगावच्या वैभवात भर पडली आहे. विशेष म्हणजे शासकीय निधी न वापरता लोकसहभागातून सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून शिवकालीन प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

राजा शिवछत्रपती महाद्वार लोकार्पण सोहळ्या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम
कोरेगाव भीमा शौर्य स्मारकाला साजेसा विकास करणार : राऊत

लोकार्पण सोहळ्या निमित्त तीन जानेवारी रोजी सकाळी सात ते अकरा दरम्यान किल्ले शिवनेरी ते नारायणगाव दरम्यान मृदा कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच ते सात दरम्यान येथील बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.४ जानेवारी रोजी सकाळी आठ ते अकरा दरम्यान होमहवन , पूर्णाहुती व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पाच जानेवारी रोजी सकाळी आठ ते अकरा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता राजा शिवछत्रपती महाद्वार या पूर्व वेशीचा लोकार्पण सोहळा खासादार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिकजी गोजमगुंडे,अतिषराजे पवार या मान्यवरांसह आजी , माजी खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com