‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद कायम माकपच्या आंदोलकांना अटक ः मंडप काढून टाकल्याचा आरोप

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद कायम माकपच्या आंदोलकांना अटक ः मंडप काढून टाकल्याचा आरोप
Published on

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद तीव्र

आंदोलकांना अटक; मंडप हटविल्याचा आरोप

ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेला वाद अधिकच तीव्र झाला असून परिस्थिती निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरेलिखित या पुस्तकावरून राज्यात राजकीय व सामाजिक पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेनंतर, तसेच प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी झालेल्या कथित वादानंतर हा मुद्दा अधिकच चिघळला आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात विविध ठिकाणी पुस्तकाचे सामूहिक वाचन आंदोलन राबवण्यात आले. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माकप) व इतर लोकशाही संघटनांनी मंगळवारी (ता. २८) बुलडाण्यात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
जयस्तंभ चौकातून आमदार गायकवाड यांच्या निवासस्थानापर्यंत धडक मोर्चा काढण्याचे नियोजन माकप नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलकांनी तेथेच पुस्तकाचे वाचन करून निषेध नोंदविला.

आंदोलनासाठी उभारलेला मंडप हटविण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील काढून टाकल्याची टीका करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी दबाव टाकल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नवले यांनी केली.

दरम्यान, काही नागरिकांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह उल्लेख सहन केला जाणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले. संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
---
छायाचित्र ओळ :
बुलडाणा : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरील वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २८) माकप व इतर संघटनांनी आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com