

Shivajinagar Court Firing | Pune Court Attack Case Two Suspects Detained
esakal
पुणे : शहरातील वर्दळीच्या आणि संवेदनशील असलेल्या शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करून कोयत्याने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. कात्रज) हा गंभीर जखमी झाला आहे. मंदार हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असून, तो १८ नोव्हेंबर रोजी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.