esakal | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
sakal

बोलून बातमी शोधा

shivajirao-Bhosale-bank.jpg

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवरील संचालक मंडळ गुरुवारी रिझर्व्ह बँकेकडून बरखास्त करण्यात आले. त्यांची जागी जिल्हा उपनिबंधक एन. व्ही, आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी याबाबतचे आदेश आज काढले. दरम्यान आघाव यांनी आज सकाळी बँकेचा पदभार स्वीकारला. 

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवरील संचालक मंडळ गुरुवारी रिझर्व्ह बँकेकडून बरखास्त करण्यात आले. त्यांची जागी जिल्हा उपनिबंधक एन. व्ही, आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी याबाबतचे आदेश आज काढले. दरम्यान आघाव यांनी आज सकाळी बँकेचा पदभार स्वीकारला. 

आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले बँकेवर 3 मे रोजी रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले. त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून या बँकेची 26 एप्रिल 2019 मध्ये छाननी करण्यात आली होती. त्यामध्ये बँकेच्या कामकाजात गंभीर चुका आणि अनियमितता असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु बँकेवर संचालक मंडळ कायम होते. अखेर रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे आदेश तीन दिवसांपूर्वी (7 ऑक्‍टोंबर) काढले. त्यावरून सहकार आयुक्त सोनी यांनी आघाव यांची प्रशासकपदी नियुक्तीचे आदेश काढले. 

रिझर्व्ह बँकेकडून सहा महिन्यांसाठी बँकेवर हे निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची मुदत पुढील महिन्यात म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. निर्बंध आल्यामुळे बँकेतून खातेदारांना एक हजार रुपयांच्या वर पैसे काढता येत नाही. आतापर्यंत एकूण थकीत कर्जापैकी 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली बँकेकडून करण्यात आली आहे. 227 कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या सुमारे 275 खातेदारांवर वसुली आणि जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ यांनी सांगितले. 

रिझर्व्ह बँक आणि सहकार आयुक्त यांच्या आदेशावरून बँकेची सूत्रे आज सकाळी हाती घेतली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व माहिती घेतली आहे. प्रशासकीय काळात कर्ज वसुलीवर भर देणार आहे. 
- एन.व्ही. आघाव (प्रशासक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक) 

बँकेची सद्यःस्थिती 
एकूण ठेवी- 430 कोटी 
एकूण कर्ज वाटप 310 कोटी 
-अनुत्पादित कर्ज - 294 कोटी 
एकूण खातेदार 16 हजार 
-बँकेंच्या एकूण शाखा- 14 

 

loading image