
पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नदीपात्रातील शिवणे ते खराडी या रस्त्याचे काम भूसंपादनामुळे रखडले होते. खराडी ते वडगाव शेरी या टप्प्यातील रखडलेल्या रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. येरवडा येथील रस्त्याच्या कामासाठी आवश्यक जागा मिळण्यासाठी महामेट्रो प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवणे-खराडी या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.