
शिवापुर टोलनाका हटलाच पाहिजे.. पुणेकरांच्या माथी हा अन्यायकारक टोल का?
धनकवडी : पीएमआरडीएची हद्द ही शहराची हद्द म्हणुन गृहीत धरल्यास नियमानुसार टोलनाका हटलाच पाहिजे., २०१९मध्ये हॅक्स् या तांत्रिक सल्लागार संस्थेने हा महामार्ग वाहतुकीस धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. अशा वेळी टोल वसूली करता येत नाही. तरीही या महामार्गावर भोर फाट्यापर्यत जाण्यासाठी पुणेकर भरतात तब्बल ८० किलोमीटरचा टोल हा अन्याय आहे. अश्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीतर्फे सरहद संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीत शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचे प्रमुख माऊली दारवटकर,निमंत्रक डॉ संजय जगताप, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी डॉ. राहुल सुर्यवंशी, शंकर कडू, ॲड अजय कपिले, बाळकृष्ण भोसले, नितीन जांभळे, भूषण शिंदे, अमर पवार, राजू फरांदे, मयूर मसूरकर आदी उपस्थित होते.
दारवटकर म्हणाले,"शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीकडून टोल वसूली बंद करण्याचे निवेदन प्रशासनाला व सर्व आमदारांना देण्यात आले आहे. परंतु भोर वेल्हा व हवेलीतील स्थानिकांनाच टोल माफी देण्याचे टोल प्रशासनाने आडमुठे धोरण घेतले आहे. सबब ही टोलमुक्ती व्हावी. याबाबत लवकर जनआंदोलन केले जाणार आहे. तसेच समितीतर्फे येत्या रविवारी १ मे रोजी शिवापुर टोल मुक्ती झाली पाहिजे. याबाबत सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
असे यावेळी नमूद केले गेली अनेक वर्षे येथील टोल भरत आहे. तरीही टोल कमी होण्याऐवजी वाढत आहे. ही टोलमुक्ती झाली पाहिजे यासाठी माझा पाठिंबा आहे. असे बाबा शिंदे यांनी सांगितले.
राजेंद्र कोंढरे म्हणाले, या टोलमुक्तीसाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि संस्था एकत्र येऊन लोकचळवळीतून प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी तज्ञ वकिलांच्या सल्ल्याने न्यायालयात यासंदर्भात लढू यात. यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी 25 हजार रुपये देणार असल्याचेही यावेळी जाहीर करतो."
Web Title: Shivapur Toll Plaza Must Be Removed Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..