पुण्यात शिवभोजन थाळी मिळणार पार्सल; रेशनकार्ड धारकांसाठी हेल्पलाईन

Shivbhojan
Shivbhojan

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन फूड पॅकेट थाळी 5 रुपये या दराने विक्री सुरु आहे. केंद्रचालकांना फूड पॅकेटव्दारे थाळी विक्री करण्याुस परवानगी दिली असून गरीब, गरजू व्यक्तींच्या ठिकाणी जाऊन त्यांना थाळी विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्हावधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाशधिकारी राम म्ह.णाले, ‘24 मार्चपासून कोविड- 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे धान्य अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजना रेशन कार्ड धारकांना पुरविण्यात येणार आहे. एप्रिल 2020 करिताचे 3 हजार 868  टन गहू व 2 हजार 548 टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहोच करण्या.त आलेला आहे. या धान्याचे वाटप रेशनकार्डवर एक एप्रिलपासून सुरू करण्याधत येत आहे.’ मे आणि जून महिन्याचे धान्य 7 हजार 737 टन गहू व 5 हजार 96 टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिलपासून पुरविण्याचे नियोजन असल्याचे त्यांननी सांगितले. हे धान्य हे केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजना रेशनकार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार आहे. कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी कार्डधारकांना धान्य वाटप करण्यावसाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका निर्धारित वेळापत्रकामध्ये 10 कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील. सोशल डिस्टंसिंग करिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करणेत आले आहे. निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदाराकडून दूरध्वनीवरुन बोलविण्याखत येणार आहे. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये याकरीता आवश्यकता भासल्यास जरुर तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

झोपडपट्टी भागात धान्य घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टयात एकूण 270 दुकानांमधून अन्नधान्य घरपोच करण्यात येईल. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक ठरविले असून त्याप्रमाणे धान्य डिलिव्हरी करण्यापूर्वी कार्डधारकांना कळविण्याात येईल.

कार्डधारकाच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू, डाळ, तेल, साखर, साबण, मीठ  कार्डधारकांच्या मागणीनुसार विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्याकचे जिल्हा्धिकारी राम यांनी सांगितले.

रेशन कार्डधारकांनसाठी हेल्पलाईन
रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 
टोल फ्री क्रमांक 1077
मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8.00 ते रात्री 8.00)
मोबाईल क्रमांक  9405163924

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्यारकरीता परिमंडळनिहाय 11 पथकांव्दारे दररोज तपासणी करण्याशत येत आहे. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधे यांची सद्यस्थितीत  एकूण 27 हजार 210 दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत. सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरीता मार्केट कमिटी, होलसेलर व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन  व्यापारी महासंघ यांच्यावशी समन्वय ठेवण्या त येत असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. काही जिल्हाबाह्य व राज्यबाह्य वाहतुकीने येणारी अन्नधान्य वाहने पोलीसांकडून अडविण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र 92 गाडयांची काल आवक झाली आहे.

लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांकरीता पेट्रोल, डिझेल तुटवडा होऊ नये याकरिता पुढील  कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांकरिता पेट्रोल व डिझेल साठा राखीव ठेवण्यात यावा, असे पेट्रोलियम कंपन्यास कळविण्या त येत आहे. अत्यावश्यक सेवांकरिता लागणा-या मनुष्यबळाला पुरवठा कार्यालयातर्फे ओळखपत्र देण्यात येत असून, 4096 ओळखपत्र विविध आस्थापनांना वितरित करण्यामत आलेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com