शिवछत्रपती पुरस्कार विजेती कुस्तीपटू अंकिता अडकणार लग्नाच्या बेडीत....

Shivchhatrapati award winning wrestler Ankita will get married soon
Shivchhatrapati award winning wrestler Ankita will get married soon

आळंदी(पुणे) : आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती आणि राज्य शासनाचा छत्रपती पुरस्कार सन्मानित कुस्तीपटू व आतंरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेश गुंड यांची कन्या अंकिता गुंडचा नुकताच साक्षीगंधाचा कार्यक्रम झाला असून ३० नोव्हेंबरला लग्न होणार आहे. आंतरराष्ट्रिय तसेच राष्ट्रिय स्तरावरिल शालेय तसेच युवा कुस्ती स्पर्धेतील यशाने अंकिता प्रकाशझोतात आली. साक्षीगंध होवून आता लग्नाचा बेडीत अडकणार असल्याने अंकिता पुन्हा चर्चेत आली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अंकिताचे संपूर्ण कुटूंबच कुस्ती क्षेत्राला वाहिलेले आहे. आजोबा धोडिंबा गुंड यांच्याकडून कुस्तीचा आलेला वारसा तिने पुढे चालू ठेवला. वडिल दिनेश गुंड स्वत: कुस्तीपटू असून कुस्तीबाबत सखोल ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची स्वत:चे आळंदीत कुस्ती केंद्र जोग महाराज व्यायामशाळा या नावाने गेली पंधरा वर्षांपासून आहे. अंकिताही त्यांचेकडेच शालेय जीवनापासून गेली तेरा वर्षे कुस्तीचा सराव करत होती. मात्र, थायलंड येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्ण पदक मिळवले आहे, तर जागतिक कुस्ती स्पर्धेत चार वेळा सहभाग होता. राष्ट्रीय स्तरावर अठरा सुवर्ण पदके अंकिता मिळवले. लॉकडाऊनच्या आधी हरियाना येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत रौप्य तर हरियाणातच आंतर विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. मात्र याचवेळी अंकिताला राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले.

हे वाचा - दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंकिताने कुस्ती क्षेत्रात स्वत:ची अल्पावधित ओळख निर्माण केली असून आता संपूर्ण महाराष्ट्रात तसेच चंदिगड, दिल्ली, हरियाना या राज्यातही ओळखली जावू लागली. तिच्यामागे कुस्तीक्षेत्राचे वलय निर्माण झाले. शाळेपासूनच वयाच्या तेराव्या वर्षापासूनच कुस्तीत चमक दाखविल्याने आंतर शालेय, जिल्हा पातळी, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरिल स्पर्धेत तिने नेत्रदिपक कामगिरी केली. वडिल स्वत: कुस्तीपटून असल्याने घरातच तिला चांगला प्रशिक्षक मिळाला आणि खेळासाठी लागोपाठच्या विजयाने अधिकच्या संधीही मिळत गेल्या. तिच्याबरोबरच तिचा छोटा भाऊ आदर्शही उत्तम कुस्तीपटू असून त्यानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेत ट्रॉफिझॉन तुर्की येथे कांस्य पदक मिळवून चमक दाखवली. संपूर्ण घरच कुस्ती क्षेत्रात आहे. कुस्तीक्षेत्रात अंकितासोबत अनेक महिला कुस्तीपटू घडविण्याचे काम वडिल दिनेश गुंड यांच्या प्रशिक्षणामुळे मिळाले. यामुळे आळंदीत आणि राष्ट्रीय स्तरावर गुंड कुटूंबाचा दबदबा आहे. संपूर्ण गुंड कुटूंबाने कुस्ती क्षेत्रात अपार मेहनत आणि नविन तंत्रज्ञान शिकण्याची जिद्दी बाळगल्याने वेगळा ठसा उमटवला आहे. 

नुकतेच अंकिताने विवाहाचा निर्णय घेतला आणि पुन्हा तिच्याबाबत चर्चा सुरू झाली. साक्षिगंध आणि साखरपुड्याचा कार्यक्रम ८ नोव्हेंबरला झाल्याने कार्तिकी आता आयुष्याच्या नव्या प्रवासास सुरूवात करणार आहे. पिंपरी महापालिका हद्दीतील काटे पिंपळे येथील मयूर विजयराव काटे यांच्यासोबत दहा दिवसांपूर्वी थाटामाटात गंधाचा कार्यक्रम झाला असून ३० नोव्हेंबरला लग्न आळंदीजवळ त्यांच्या मूळ गावी केळगाव येथे होणार आहे. अर्थात लॉकडाऊनमुळे कमी लोकांच्या उपस्थितीत लॉकडाऊनचे नियम पाळून सोहळा पार पडणार आहे. यासाठी केळगाव येथील तिच्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत मंडप आणि वाहनतळाची सोय केली जात आहे. मयूर पदवीधर असून संगणक व इंटरनेटच्या व्यवसायात आहे.  

अंकिताने एमएबीपीएड केले आहे. अचानक अंकिताच्या साक्षिगंधाची चर्चा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र दोघांचेही अरॅज मॅरेज आहे आणि हो अंकिताच्या सासरवाडीत कुस्तीची परंपरा नसली तरी सासरकडील मंडळी तिच्या कुस्तीक्षेत्रात खंड पडू नये यासाठी स्वत:च्या मालकीची जिम आणि कुस्तीकेंद्राची उपलब्ध करून देणार आहेत. इतकी वर्षे कुस्ती खेळून आयुष्याचा जोडीदार मात्र कुस्ती क्षेत्रातला नको असा आग्रह अंकिताचा कायम होता. म्हणूनच कुस्तीशी संबंध नसलेल्या मयूरीची जोडीदार म्हणून निवड केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com