केळघर शिवेंद्रसिंहराजे बातमी

केळघर शिवेंद्रसिंहराजे बातमी

Published on

पातळी सोडल्यास विरोधकांना जशास तसे उत्तर

शिवेंद्रसिंहराजे भोसले; आंबेघरमध्ये ज्ञानदेव रांजणेंच्या वाढदिनी स्नेहमेळावा

केळघर, ता. ४ : निवडणुका आल्या, की जावळी तालुक्यातील विरोधकांना जनतेचा खोटा कळवळा येतो. मंत्रिपद असताना तालुक्यासाठी एकही दमडी निधी न देणाऱ्यांनी जनतेचा बुद्धिभेद करू नये. मी कधीही दादागिरी व दहशतीचे राजकारण केले नाही. विरोधकांनी पातळी सोडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यात निश्चित आहे, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेघर येथे आयोजित स्नेहमेळावा व कुसुंबी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, राजू भोसले, अर्चना रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, पांडुरंग जवळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, मेढ्याच्या नगराध्यक्षा रूपाली वारागडे, नगरसेवक शिवाजीराव देशमुख, विकास देशपांडे, शिवाजी गोरे, रिकी तिवाटणे, सुशांत कांबळे, नितीन मगरे, तेजस्वी इगावे, आनंदी करंजेकर, पुष्पा मुकणे, सुनीता तांबे, अनघा करंजेकर, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, सुनील जांभळे, सागर धनावडे, विलास जवळ, बबन बेलोशे, हरिभाऊ शेलार, मारुती चिकणे आदींची उपस्थिती होती.
मंत्री भोसले म्हणाले, ‘‘जावळीच्या जनतेने भरभरून प्रेम दिल्याने सलग तीन टर्म आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकासकामे करत असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार असून, सर्व उमेदवार निश्चितच निवडून येतील.’’
मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले. भविष्यात नगरपंचायतीची नगरपालिका करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेढा शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी काम करणार आहे, तसेच तालुक्यातील सर्व गावांतील स्मशानभूमीला जोडणारे पक्के रस्ते करणार आहे.
बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न समन्वयातून सोडवणार आहे. तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्री म्हणून काम करत आहे. दिलेला शब्द पाळण्याचे काम (कै.) भाऊसाहेब महाराज यांच्यापासून सुरू आहे. श्री. रांजणे यांनी तालुक्यात विकासकामांसाठी नेहमीच पाठपुरावा केला असून, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार, अशी ग्वाही मंत्री भोसले यांनी दिली.
श्री. रांजणे म्हणाले, ‘‘मंत्री भोसले यांनी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर विकासकामे केली असून, कुसुंबी गटात ९१ गावे व ६५ बूथ असून, प्रत्येक गावांत बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून, विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड जनतेच्या आशीर्वादाने देणार आहे.’’
केळघर- डांगरेघर पुलासाठी आठ कोटी व केळघर- डांगरेघर रस्त्यासाठी १० कोटी रुपये निधीचा प्रस्ताव नाबार्डच्या माध्यमातून मंजूर झाला असून, लवकरच या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.’’
रामभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, युवक, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
--------------------------
चौकट

विकासकामांचे भूमिपूजन

बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कुसुंबी गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. त्यामध्ये पुनवडी पुलासाठी ११ कोटी, आंबेघर येथे रामजी बुवा पुलासाठी आठ कोटी, वरोशी- वाहिटे रस्ता १० कोटी, केळघर- कुरुळोशी रस्ता अडीच कोटी, मालचौंडी- दुंद रस्ता अडीच कोटी, वाटंबे- केडंबे पुलासाठी सहा कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
--------------------------------

01312
आंबेघर : ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात सत्कारप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे भोसले. समवेत सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, अर्चना रांजणे, रूपाली वारागडे, राजू भोसले आदी.
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com