डीजे संस्कृतीला फाटा देत युवा महाराष्ट्र समूहाने केली 'वैचारिक शिवजयंती' साजरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील डीजे संस्कृतीला फाटा देत डॉ. डि वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी येथील युवा महाराष्ट्र समूहाने 'वैचारिक शिवजयंती' साजरा केली. युवा महाराष्ट्र समूह हा नेहमीच व्यक्तीपुजनापेक्षा त्या व्यक्तीच्या विचारांना प्राधान्य देत आले आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

पिंपरी - दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील डीजे संस्कृतीला फाटा देत डॉ. डि वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी येथील युवा महाराष्ट्र समूहाने 'वैचारिक शिवजयंती' साजरा केली. युवा महाराष्ट्र समूह हा नेहमीच व्यक्तीपुजनापेक्षा त्या व्यक्तीच्या विचारांना प्राधान्य देत आले आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावर्षी शिवजयंती सोहळ्याचे निमित्त साधुन रणधुरंधर महानाट्याद्वारे संभाजीराजांचा इतिहास आणि शिवविचार लोकांसमोर मांडला. समूहातील काही मुलांनी किल्ले शिवनेरी येथून पायी शिवज्योत आणली. कार्यक्रमाची सुरुवात पालखी मिरवणुकीने करण्यात आली. गणराज वाद्यपथकाने पालखीसमोर सुरेख वादन केले. भरपूर गर्दी असूनदेखील मुलांनी शिस्तबद्धरितीने मिरवणूक पार पाडली. या सोहळ्यास श्री.प्रमोद कल्लाप्पा मोर्ती (शिवकालीन घटनांचे चित्रकार) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सोबतच शिक्षक प्रतिनिधी गणेश पाटिल, मुकेश घोगरे, शेंडे सर आणि शिक्षक मान्यवर आणि पालक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या मालमत्तांचे कर वाढणार

संभाजी राजांबद्दल बराच चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला आहे पण तो पुसून खरा इतिहास लोकांपुढे आणायचं काम युवा महाराष्ट्रने केले आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमात केले. विद्यालयाचे संचालक डॉ. पी. डि. पाटिल साहेब, प्राचार्य प्रमोद पाटिल, अधिष्ठाता डॉ. उर्मिला पाटिल यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व मुलांच्या कामाचे कौतुक केले. मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता आजही मुले आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ आहेत हे या कार्यक्रमातून दिसून येते. मराठमोळ्या पेहेरावात उपस्थित असलेल्या युवक-युवतींमुळे सारे वातावरण शिवमय अन मराठीमय झाले होते. आजचे तरुण हे फक्त डीजे लावूनच शिवजयंती साजरा करतात असे अजिबात नाही हे या कार्यक्रमाने सर्वांना दाखवून दिले. युवा महाराष्ट्र आयोजित रॉयल इंफिल्ड व ढोणे ऑटोमोबाईल प्रस्तुत शिवजयंती सोहळा सुमारे १००० ते १२०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivjayanti celebration by youth maharashtra group in pimpri