

कोट येणार आहेत.
शिवणे, ता. २३ : विकास आराखड्यात ३० मीटर रुंदीचा प्रस्ताव असतानाही वारज्यातील आंबेडकर चौक ते गणपतीमाथा या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण अद्याप रखडले आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे व कोपरे येथील नागरिकांना दररोज सहन करावा लागत आहे. दरम्यान, शिवणे परिसरात महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, वारजेतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवणे-उत्तमनगरचा महापालिकेत २०१७ मध्ये समावेश झाला असून, या परिसराचा विकास आराखडा अद्याप राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. असे असतानाही शिवणे परिसरात कारवाई केली जात असल्याने, ‘वारजेकडे दुर्लक्ष करून शिवणेवरच कारवाई का? दुजाभाव करू नका,’ अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
वारजे गावाचा १९९७ मध्ये महापालिकेत समावेश झाला. येथील विकास आराखडा १३ वर्षांपूर्वी मंजूर झाला असून, त्यामध्ये आंबेडकर चौक, गणपतीमाथा, अहिरेगाव कमानमार्गे शिवणेकडे जाणारा मुख्य रस्ता ३० मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने रस्ता अरुंद झाला असून, फुटपाथचीही सुविधा नाही. त्यामुळे या मार्गावर तासन् तास कोंडी होते.
दुसरीकडे, वारजे येथील सह्याद्री शाळेपासून वारजे गावठाण, रामनगरमार्गे शिवणे येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातून शिंदे बोकडपर्यंत कालव्यालगतचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गाचेही अपेक्षित रुंदीकरण झालेले नसून, अतिक्रमणांमुळे तो अरुंद झाला आहे. या मार्गावर बससेवा सुरू आहे, मात्र अरुंद रस्त्यामुळे बस वाहतुकीला मोठ्या अडचणी येत आहेत. दोन्ही भागांत समान निकष लागू करून वारजेतील अतिक्रमणेही तातडीने हटवावीत, अशी मागणी शिवणे-उत्तमनगर ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.