
पुणे : ‘शिवशाही’ पाठोपाठ आता ‘शिवनेरी’ बसचाही प्रवास प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. सोमवारी (ता. २३) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे-पुणे शिवनेरी केवळ ४० टक्के ‘चार्ज’ असल्याचे चालकाने खालापूर टोलनाक्यापाशी जाहीर केले. बस कुठेही केव्हाही बंद पडण्याची शक्यता असल्याचेही त्याने सांगून टाकल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. अखेर प्रवाशांच्या सुदैवाने बस सुरळीतपणे पुण्यात दाखल झाली.