shivneri
shivnerisakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने शिवनेरी दुमदुमली

शिवनेरी गड सुमारे वर्षांनंतर शिवभक्तांसाठी खुला झाल्याने गडावर शिवभक्तांचा ओघ सुरू झाला आहे.
Published on

जुन्नर : ऐतिहासिक किल्ले शिवनेरी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'हर हर महादेव' च्या घोषणांनी दुमदुमू लागली आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड सुमारे वर्षांनंतर शिवभक्तांसाठी खुला झाल्याने गडावर शिवभक्तांचा ओघ सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके खुली करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा आदेश झाल्या- नंतर गडावर जाण्याच्या मार्गावर प्रवेश- बंदीसाठी लावण्यात आलेला अडथळा (बॅरिकेट) वनपाल नितीन राऊत यांनी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या आदेशाने शुक्रवारी (ता. १८) दूर केला. यावेळी कुसुर वनहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष आदित्य दुराफे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे उपस्थित होते. यावेळी काजळे यांनी गडावर आलेल्या शिवभक्तांचे स्वागत केले.

shivneri
मोदींनी मंत्रिमंडळातून काढलं; नाराज खासदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

आज शनिवार ता.१९ रोजी सकाळ पासून शिवनेरीला भेट देणारे पर्यटक येत होते. सर्वप्रथम बुलढाणा येथील महाविद्यालयात कार्यलयीन अधीक्षक पदावर कार्यरत असलेले जयंत दळवे सहकुटुंब शिवनेरीवर आले होते. त्यांनी गड खुला केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

गड खुला झाल्यानंतर काल(ता.१८) पासून दुचाकी व चारचाकी वाहनातून आलेल्या हजाराहून अधिक शिवभक्तांनी गडावर जाऊन शिवजन्मस्थानाला वंदन केले. यात

पुणे, नगर, सोलापूर,बुलढाना, नाशिक जिल्ह्यातील विविथ ठिकाणाहून आलेल्या शिवभक्त व पर्यटकांचा समावेश होता.

पर्यटकांनी कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता असून शारिरीक अंतर बाळगणे, मास्कचा तसेच सॅनिटायझर वापर बंधनकारक आहे.

शिवनेरी पर्यटक व शिवभक्तांसाठी खुला झाला असला तरी गडावरील शिवाई मातेचे मंदिर मात्र बंद असल्याने शिवप्रेमीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. गडा प्रमाणे मंदिरे खुली करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com