

Bullock cart racing competition Shivneri Kesari 2026 to be held at Wadgaon Kandali in Junnar
esakal
राजेश कणसे
आळेफाटा : पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतींची पंढरी म्हणून संभोधल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री पिरसाहेब व मुक्ताईदेवी यात्रा उत्सव तसेच दिवाळी फेस्टिव्हलनिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष असून, ‘शिवनेर केसरी २०२६’ या नावाने होणाऱ्या या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे.