esakal | 'मोदी सरकार शेतकरीविरोधी'; घोडेगाव येथे शिवसेनेचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

'मोदी सरकार शेतकरीविरोधी'; घोडेगाव येथे शिवसेनेचे आंदोलन

कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. ही बंदी त्वरीत उठवावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.   

'मोदी सरकार शेतकरीविरोधी'; घोडेगाव येथे शिवसेनेचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

घोडेगाव : लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना मागील आठवड्यात कांद्याला ३ हजार ते ४ हजारपर्यंत उच्चांकी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अचानकपणे कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. ही बंदी त्वरीत उठवावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसिल कचेरीसमोर आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. कांद्याची निर्यातबंदी त्वरित उठवावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, शिवसेना जेष्ठ नेते प्रा. राजाराम बाणखेले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, शिवसेना जिल्हा समन्वयक रविंद्र करंजखेले, युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रविण थोरात पाटील, कल्पेश बाणखेले, धनेश मोरडे, शिवाजी राजगुरू, पंचायत समिती सदस्या सौ.अलका घोडेकर, महिला आघाडीच्या सौ. मालती थोरात, मिलिंद काळे, संतोष डोके, शिवसेना घोडेगाव शहरप्रमुख तुकाराम काळे, शिवसेना विभागप्रमुख संजय चासकर, गोविंदराव काळे, उल्हास काळे, अमोल काळे यांच्यासह मोठया संख्येने शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.      आढळराव पाटील म्हणाले, ''शिवसेनेने यापूर्वी अनेकदा सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक लढे यशस्वीपणे लढले आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी "विकेल ते पिकेल यांसारख्या विविध योजना प्रभावीपणे राबवित असताना भाजप शासित केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला लागले होते. कांद्याला प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपये दर मिळत असताना कांदा निर्यात बंदीमुळे भाव १०००-१५०० रुपयांनी कमी झाला असून, शेतकऱ्याने जगायचं की नाही? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केंद्र सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास पुणे जिल्ह्यात शिवसेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)